१) अनुसूचित जाती, नवबौद्ध, प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा व त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, तसेच सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये ते टिकून रहावेत यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
२) यासाठी इयत्ता १० वी मध्ये ७५% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून इयत्ता ११ वीं मध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील मुलां- मुलींसाठी ही योजना लागू आहे.
३) ही शिष्यवृत्ती योजना इयत्ता ११ वीं व १२ वी मध्ये शिकणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील अनुसूचित जाती व नवबौद्ध, प्रवर्गातील मुलां-मुलींसाठी आहे.
इयत्ता | शिष्यवृत्ती दर | कालावधी | रुपये |
---|---|---|---|
११ वी | रु.३००/- दरमहा | १० महिने | रु.३०००/- |
१२ वी | रु.३००/- दरमहा | १० महिने | रु.३०००/- |
दिनांक २३.०१.२०२५ च्या सद्यस्थितीनुसार
अनु क्र. | शैक्षणिक वर्ष | प्राप्त अर्ज संख्या | मंजुर अर्ज संख्या |
---|---|---|---|
१ | २०२४-२५ | १५५१ | १५४१ |
२ | २०२३-२४ | २०४५ | १८०१ |
३ | २०२२-२३ | २७८६ | २६१५ |
४ | २०२१-२२ | २५३५ | २४७९ |
या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.
१) सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर
२) संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य