अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे.
१) लाभार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा.
२) लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्ष असावे.
३) लाभार्थ्याकडे स्वतःच्या मालकीची जागा / कच्चे झोपडे असावे.
४) अर्जदाराकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र असावे,
५) अर्जदाराचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला.
६) अर्जदाराकडे टॅक्स रसीद व जमिन मालकीचे दस्तावेज असावे.
७) अर्जदाराने कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
८) कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ देय राहील.
९) अर्जदाराकडे दि.1.1.1995 पुर्वीचा रहिवासी पुरावा असावा. (झोपडपट्टी धारकांसाठी)
१०) ग्रामसेवकाचा दाखला (ग्रामीण क्षेत्रासाठी)
११) राशनकार्ड, 7/12 उतारा, मालमत्ता नोंदपत्र (प्रॉपर्टी रजिस्टर कार्ड) ग्रामपंचायतीमधील मालमत्ता नोंदवहीचा उतारा यापैकी एक.
१२) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामिण क्षेत्र रु.१२०,०००/-पर्यंत असावे.
१३) शहरी क्षेत्र (नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत, महानगर पालिका) रू.३,००,०००/- पर्यंत असावे.
ग्रामिण क्षेत्राकरीता रु.१,२०,०००/- व
शहरी क्षेत्राकरीता (नगरपालिका/नगरपरिषदे / नगरपंचायत, महानगरपालिका) रु.२,५०,०००/- अनुदान दिल्या जाते.
अ) जातीय दंगलीमध्ये घराचे नुकसान (आगीमुळे व इतर तोडफोड) झालेली व्यक्ती
आ) ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार पिडीत झालेल्या अनुसूचित जातीची पात्र व्यक्ती
इ) पुरग्रस्त क्षेत्र.
ई) विधवा महिला
उ) इतर
अनु क्र. | वर्ष | शहरी उद्दिष्ट | शहरी मंजूर अर्ज | शहरी पूर्ण | ग्रामीण उद्दिष्ट | ग्रामीण मंजूर अर्ज | ग्रामीण पूर्ण |
---|---|---|---|---|---|---|---|
१ | २०२४-२५ | २४०६ | ५९६ | १३० | १००० | ४०० | ० |
२ | २०२३-२४ | २५२० | २३५० | ५९६ | १०००० | ६१६७ | ५७० |
३ | २०२२-२३ | अप्राप्त | ० | ० | अप्राप्त | ० | ० |
४ | २०२१-२२ | २३६० | ९३८ | ४४९ | ३००० | १००० | ६७८ |
ग्रामिण क्षेत्र - ग्रामसेवक, सरपंच, पंचायत समिती ,
प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा,
जि.प. नागपुर.
शहरी क्षेत्र - (नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत) संबंधित
तालुक्याचे मुख्याधिकारी यांचे कार्यालय,
(महानगरपालिका) संबंधित झोनचे सहाय्यक
आयुक्त व महानगर पालिका कार्यालय.
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,नागपुर