राज्यातील तृतीयपंथी यांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरावर व विभागीय स्तरावर राज्यातील तृतीयपंथी हक्काचे संरक्षण व कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले. तृतीयपंथी / ट्रान्सजेंडर हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असुन या घटकास समाजाकडून सापत्न व भेदभावाची वागणुक दिली जाते. नेहमीच भेदभाव, सापत्न वागणुकीमुळे समाजातील हा घटक विकास प्रक्रीयेपासुन दुर्लक्षित राहीलेला आहे. त्यामुळे या समाज घटकांचे शासनामार्फत मुलभुत अधिकारांचे संरक्षण करून त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
अनु क्र. | वर्ष | लाभार्थी संख्या |
---|---|---|
१ | २०२४-२५ | १६९ |