• जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रम आयोजित करणे •

Scheme-image

उदिृष्ट : 

भारतीय समाजात रुजलेल्या काही अनिष्ट व अघोरी अमानुष, संस्कारातून रुजलेल्या अनेक प्रकारच्या गैरसमजूतीमुळे समाजाचे अतोनात नुकसान होत असल्याने लाखो माणसांचे जीव वाचविण्यासाठी त्यांचे होणारे शोषण व छळ थांबविण्यासाठी व समाजाचे मानसिक स्वास्थ सुधारण्यासाठी शासनाने दि. 20 डिसेंबर 2013 रोजी "महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष् अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व त्यांचे समुळ उच्चाटण करण्यासाठी महाराष्ट्र अधिनियम 2013 लागू करण्यात आलेला आहे.

जादु‌टोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी करिता जिल्हास्तरावर जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षेतेखाली जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती दि. 28 जुन 2022 च्या शासन निर्णयान्वये गठित करण्यात आली आहे.

जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष मा. जिल्हाधिकारी नागपूर हे आहे. सदर समितीच्या बैठका किमान वर्षातून दोन वेळा घेण्यात येतात.

(PIMC) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत गठीत झाली असून कायदयाचा प्रभावी पणे प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत कार्यक्रम सुरु आहेत.


संपर्क:

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर