राज्यातील 65 वर्ष वय व त्याहून अधिक वय असणा-या जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जिवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांच्या वयोमान परत्वे येणारे अंपगत्व,अशक्तपणा यावर उपाय योजना करण्यासाठी तसेच त्यांची मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी शासन निर्णय क्र.जेष्ठना-2022/प्र.क्र.344/सामासु, दिनांक-06.02.2024 अन्वये मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे.
1) सदर योजने अंतर्गत लाभार्थी व्यक्ती, जेष्ठ नागरीक यांची दिनांक 31/12/2023 अखेर पर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केली असावी
२) ज्या व्यक्तींचे वय 65 वर्ष किंवा त्याहून अधिक आहे (जेष्ठ नागरिक) त्यांचे कडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधारकार्ड साठी अर्ज केला असावा. आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे.
३) लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल राशनकार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्र शासित सरकारच्या इतर कोणत्याही पेंशन योजनअंतर्गत वृध्यापकाळ निवृत्ती वेतन मिळत असल्यास पुरावा सादर करण्यात यावा.
४) लाभार्थ्यांचे कौटुबिंक वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे. याबाबत लाभार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.
5) लाभार्थ्यांनी आधारकार्ड/ मतदान कार्ड सोबत जोडावे
६) राष्ट्रीयकृत बॅकेंची बॅक पासबुक झेरॉक्स प्रत सादर करावे.
७) पासपोर्ट आकाराचे दोन फोटो.
८) लाभार्थ्यानी उत्पादनाचे,व आवश्यक असलेल्या साहित्याचे स्वंयघोषणापत्र 2 वेगवेगळे.जोडवे
9) शासनाने ओळख पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
सदर योजनेअंतर्गत पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारिरीक असमर्थंता/दुर्बतेनुसार सहाय्यक भुत साधने/उपकरणे खरेदी करता येईल.
उदा.
सदर योजनेअंतर्गत पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारिरीक असमर्थंता/दुर्बतेनुसार सहाय्यभुत साधने/उपकरणे रु.3000 पर्यंत खरेदी करता येईल.
अनु क्र. | वर्ष | प्राप्त अर्ज | पात्र अर्ज |
---|---|---|---|
१ | २०२४-२५ | ८६९४६ | ७७७८० |
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर