• अनुसूचित जातीच्या सहकारी सूतगिरण्यांना दीर्घ मुदतीच्या कर्जाची योजना •

Scheme-image

उद्दिष्ट :

सहकार व वस्त्रोद्योग विभागाने पुरस्कृत केलेल्या मागासवर्गीयांच्या सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज मंजूर करण्याबाबतची योजना राज्यात कार्यान्वित आहे.

अटी व शर्ती :

प्रकल्प मूल्य महत्तम रु.61 कोटी. प्रकल्प किंमतीच्या 5% आणि किमान रु. 80 लाखापर्यंत सभासद भाग भांडवल गोळा केल्यानंतर सदर सुतगिरणी कर्जास पात्र होते.

वित्तीय सहाय्याचे सूत्र :

  • सभासद भागभांडवल-5% (किमान रु.80 लाख)
  • सहकार व वस्त्र उद्योग विभागाकडून भागभांडवल -45%
  • सामाजिक न्याय विभागाकडून दीर्घ मुदतीचे कर्ज-50%
  • प्रकल्प किंमतीच्या 90% रक्कम सूत गिरणींना अदा केल्यानंतर 2 वर्षानी कर्ज वसूली सुरु करण्यात येते.
  • कर्जाची परतफेड 6 वर्षाच्या कालावधीत एकूण 24 समान त्रैमासिक हप्त्यात करण्यात येते.

सुतगिणींचे नाव :

  1. मातोश्री मागासवर्गीय शेतकरी सहकारी सुतगिरणी मर्या.,सावरगांव, ता.नरखेड, जि.नागपूर
  2. गौतम मागासवर्गीय कापूस उत्पादक सहकारी सुतगिरणी मर्या.,निंबा, ता.पारशिवणी, जि.नागपूर
  3. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सुतगिरणी मर्या., भांसुली, बुट्टीबोरी, नागपूर

संपर्क :

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर