• शाहु, फुले, आंबेडकर पुरस्कार •

Scheme-image

तपशिल

महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातील योगदानामुळे महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय व अंतराराष्ट्रीय पातळीवर एक प्रगत सामाजिक सुधारणावादी राज्य म्हणून घेतले जाते. अशा सामाजिक न्यायाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थांना महाराष्ट्रातील सर्वोच्च्‍ा प्रतिष्ठेचा शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार सन 2005-2006 पासून सुरु करण्यात आला असून त्याचे वितरण सामाजिक न्यायदिनी केले जाते.

स्वरुप

सदरचा पुरस्कार एकूण 6 विभागातील प्रत्येकी 1 याप्रमाणे 6 संस्थांना प्रत्येकी रु.15 लाख याप्रमाणे पुरस्काराची रक्कम देण्यात येते.

पुरस्कारासाठी निवडीचे निकष (संस्था)

१) राज्य शासनाच्या Rules of Business अनुसार हा विभाग कार्यरत असला पाहिजे.

२) संस्थेने समाजातील अतिशय दुर्बल व मागासवर्गीय घटकातील व्यक्ती व समाजासाठी सेवा, शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन, रोजगार अशा व यासारख्या व्यक्तिगत व सामूहिक क्षेत्रामध्ये एकमेव अद्वितीय कार्य केलेले असले पाहिजे.

३) सदर संस्था संबंधित क्षेत्रात किमान मागील १० वर्षापासून कार्यरत असणे आवश्यक आहे.

४) संबंधित संस्था ही मुंबई विश्वस्त नोंदणी अधिनियम १९५० व संस्था नोंदणी अधिनियम १८६० अन्वये नोंदणीकृत असावी.

५) संस्थेची आर्थिक स्थिती बळकट असली पाहिजे.

६) संबंधित संस्थेविरुद्ध किंवा पदाधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा किंवा दंडात्मक कार्यवाही झालेली नसावी.

संपर्क :

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत देण्यात आलेले पुरस्कार

अनु. क्र  वर्ष  व्यक्ती संस्था  एकूण
२०२२-२३
२०२१-२२
२०२०-२१
२०१९-२०