• संत रविदास पुरस्कार •

Scheme-image

तपशिल

चर्मकार व अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या उध्दारासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्थांना संत रविदास यांच्या जयंती दिनी दि.6 फेब्रुवारी रोजी पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पुरस्कार सन 2004-05 पासून देण्यात येतो.

स्वरुप

1 व्यक्ती व 1 संस्था यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो प्रत्येक व्यक्तीस रु.21000/- पुरस्कार, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल किंवा साडी, खण व श्रीफळ तसेच एका संस्थेसाठी रु.30001/- स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व शाल, श्रीफळ देऊन गौरव केला जातो.

पुरस्कारासाठी निवडीचे निकष (व्यक्ती)

१) चर्मकार समाजाच्या व दलित समाजाच्या १ कल्याणासाठी झटणारे नामवंत समाज सेवक असावेत.

२) सामाजिक क्षेत्रात कमीत कमी १५ वर्षे कार्य केलेले असावे.

३) एका व्यक्तीस एकापेक्षा जास्त पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही.

४) लोकनियुक्त प्रतिनिधी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

५.) पुरुष ५० वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त.

६) स्त्री ४० वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त.

पुरस्कारासाठी निवडीचे निकष (संस्था)

१.समाज कल्याण क्षेत्रात चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अन्याय निर्मूलन, अंधश्रद्धा रुढी निर्मूलन, जनजागृती इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना हा पुरस्कार दिला जाईल.

२.वरील समाज कल्याण क्षेत्रात किमान १० वर्षाहून अधिक काळ कार्य केलेले असावे. विशेष मौलिक व भरीव काम करणाऱ्या संस्थेच्या बाबतीत अट शिथिलक्षम राहील.

संपर्क :

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत देण्यात आलेले पुरस्कार:

अनु. क्र वर्ष व्यक्ती संस्था एकूण
२०२२-२३
२०२१-२२
२०२०-२१
२०१९-२०