• डॉ. बाबासाहेव आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, (कृषी समृदृधी योजना) •

Scheme-image

उद्दिष्ट:

जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

मागासवर्गीय व नवबौध्द शेतकरी कुटुंबांना दारिद्ररेषेच्या वर आणण्यासाठी विशेष अर्थसहाय्य योजना

अनुदान:

या योजनेंतर्गत नवीन विहीर (रु.2.50 लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार), इनवेल बोअरींग (रु.20 हजार), पंप संच (रु.20 हजार), वीज जोडणी आकार (रु.10 हजार), शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1 लाख) व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच-रु.50 हजार किंवा तुषार सिंचन संच-रु.25 हजार), पीव्हीसी पाईप (रु.30 हजार) परसबाग (रु.500/), या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे.

अटी व शर्ती:

  • लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  • जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी.
  • उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे.

संपर्क :

  1. कृषी विकास अधिकारी, जिल्हापरिषद, नागपूर
  2. गट विकास अधिकारी, संबंधित पंचायत समिती

सूचना  :

अर्ज प्रणालीचं स्वरूप ऑनलाइन असेल.