उद्दिष्ट:
अनुसूचित जाती / नवबौद्ध लाभार्थ्यांना 75% अनुदानावर
अटी व शर्ती:
लाभार्थ्यांची निवड खालील प्राधान्यक्रमांकानुसार करण्यात येते.(उतरत्या क्रमानं)
- दारिद्रयरेषेखालील लाभार्थी
- अत्यल्प भूधारक शेतकरी (1 हेक्टरपर्यंतचे भूधारक)
- अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टरपर्यंतचे भूधारक)
- सुशिक्षित बेरोजगार (रोजगार वस्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)
- महिला बचत गटातील लाभार्थी (अनु.1 ते 4 मधील)
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्र:
- फोटो ओळखपत्राची सत्यप्रत.
- ग्रामपंचायत (नमुना क्र.8 चा उतारा).
- दारिद्रयरेषेखालील असल्याचा दाखला.
- 7/12 व होल्डिंग उतारा.
- जातीच्या दाखल्याची सत्यप्रत.
- अपत्य दाखला सत्यप्रत.
- रोजगार स्वयंरोजगार नोंदणी कार्डाची सत्यप्रत.
- बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र.
लाभाचे स्वरूप:
शेळ्या आणि (01) बोकड वैयक्तिक लाभाची योजना
संपर्क :
- जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि. प. नागपूर
- गट विकास अधिकारी, संबंधित पंचायत समिती