महाराष्ट्र राज्यातील (नागपूर जिल्हा) रहिवाशी असणारे परंतु दुसऱ्या राज्यात प्रवेश घेतलेल्या अनु.जाती, प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सदर योजना लागु आहे.
१) विद्यार्थी हा अनु. जाती, नवबौद्ध, प्रवर्गातील असावा.
२) अनु. जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
३) विद्यार्थी शालांत परीक्षोत्तर व त्यापुढील शिक्षण घेत असलेला असावा.
४) विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
१) विद्यार्थ्यास निर्वाहभत्ता व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क.
२) अनु. जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना दरमहा रु. २५० ते रू.७०० दराने निर्वाहभत्ता.
३) वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या अनु. जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी दरमहा रु.४०० ते रु.१३५० निर्वाहभत्ता.
अनु. क्र | वर्ष | प्राप्त अर्ज संख्या | लाभार्थ्यी अर्ज संख्या | रक्कम |
---|---|---|---|---|
१ | २०२४-२५ | ७४ | ५६ | १,२३८,९३५० |
२ | २०२३-२४ | ५६ | ५६ | ८,३२८,०६५ |
३ | २०२२-२३ | ४० | ४० | ६,०६७,५९३ |
४ | २०२१-२२ | ६२ | ६२ | ८,८९०,८२५ |
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर