उद्दिष्ट:
मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आलेली आहेत. सदरची योजना सन १९२२ पासून कार्यान्वित आहे. सध्या महाराष्ट्र विभागीय, जिल्हा व तालुका पातळीवर ३८१ वसतिगृहे मंजूर असून त्यापैकी ३७७ सुरू असून मुला-मुलींची ( मुलांची २१८ + मुलींची १६३ ) शासकीय वस्तीगृहे कार्यान्वित असून त्यामध्ये ३५५३० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होत आहे.
लाभाचे स्वरूप:
- मोफत निवास व भोजन, अंथरूण-पांघरूण, ग्रंथालयीन सुविधा.
- शालेय विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी दोन गणवेष.
- क्रमिक पाठ्यपुस्तके, वह्या, स्टेशनरी इत्यादी.
- वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्टेथोस्कोप, अँप्रन, ड्रॉईंग बोर्ड, बॉयलर सूट व कलानिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी रंग, ड्रॉईंग बोर्ड , ब्रश कॅनव्हाश इ.
- वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी निर्वाहभत्ता.
वसतिगृह:
- नाव : संत चोखामेळा मुलांचे शासकीय वसतिगृह, नागपुर
- पत्ता : शताब्दी चौक, रमानगर, जुनी व्हि. टी. कॉन्व्हेंट, नागपूर -२७
- संपर्क व्यक्ती : श्री. बी. बी. साखरकर,अति. गृहप्रमुख
- मोबाईल : ८२०८०५३१७८